Sanket Kulkarni
दक्षिण आफ्रिकेत 2007 साली T-20 ची पहिली World Cup स्पर्धा भारतीय संघाने (Indian Team) आपल्या नावावर करत, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का दिला.
या T-20 स्पर्धेतूनच भारतीय संघाला महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) रुपाने कॅप्टन कुल (Captain Cool) मिळाला.
या World Cup मधील पाकिस्तानचा कर्णधार मिसबा उल हकने (Pakistan captain Misbah-ul-Haq) खेळलेला हा स्कुप शॉट पहिल्यांदा पाहिल्यावर सर्व भारतीयांचे धाबे दणाणले होते. एक क्षण सर्वांना वाटले World Cup भारताच्या हातातून गेला.
पण श्रीसंतने (Sreesanth) मिसबाचा (Misbah-ul-Haq) घेतलेला हा झेल पाहून, भारतीयांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर भारतात त्या दिवशी दिवाळी सुरु झाली. सर्व भारतीय क्रिकेट चाहत्यांचे स्वप्न पुन्हा एकदा सत्यात आले.
1985 नंतर भारतीय कर्णधाराने ICC World Cup ची ट्रॉफी उचलली, त्यावेळी खेळाडूंसह सर्व भारतीयांना गहिवरुन आले आणि T-20 World Cup च्या रुपाने भारताने दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकला.
या World Cup चा खरा हिरो ठरला तो भारताचा युवराज सिंग (Yuvraj Singh), त्याने इंग्लंड विरुध्द स्टुवर्ट ब्रॉडला मारलेले 6 चेंडूत 6 षटकार आजही आपल्याला पहावयास आवडतात.
2007 च्या या T-20 वर्ल्डकप मधील भारताचा सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने देखील या वर्ल्डकपमध्ये महत्त्वाच्या वेळी महत्त्वाची खेळ केल्याने भारताच्या या नवख्या संघाने अव्दितीय कामगिरी केली आहे.
सचिन, सौरव, द्रविड हे भारताचे त्यावेळचे दिग्गज खेळाडू त्यांनी या T-20 वर्ल्डकपमधून आधीच माघार घेतली, त्यामुळे भारतीय संघ (Indian Team) या वर्ल्डकपमध्ये लीग स्टेजमध्येच बाहेर पडणार असे वाटत असताना भारताच्या त्या वेळच्या युवा ब्रिगेडने केलेल्या या कमगिरीमुळे तेव्हापासूनच भारतीय संघाचा कायापालट झाला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.