Sameer Panditrao
मानसिक आरोग्यासाठी ‘सोशल टाईम’ महत्त्वाचा आहे आणि मित्र यासाठी महत्वाचा उपाय आहेत.
काम, मोबाईल आणि जबाबदाऱ्या — यामुळे आपल्या मैत्री मागे पडते. पण मनाला आनंद देणारा संवाद मित्रांशीच होतो.
शोध सांगतात की, मित्रांसोबत बोलल्याने तणावाचे प्रमाण घटते, हार्मोनल बॅलन्स सुधारतो, आणि आत्मविश्वास वाढतो.
फक्त गप्पा नाही, तर मन मोकळं करणं हाच खरा उपाय. यासाठी मित्रच हवेत.
दर आठवड्यात मित्रांना भेटण्यासाठी फक्त एक तास द्या. हा एक तास तुमच्या पुढच्या सात दिवसांच्या मूडला सांभाळेल.
मोबाईलवर नाही, समोरासमोर भेटा. मनमोकळ्या गप्पा मारा.
एक तासाची ही गुंतवणूक तुम्हाला कायम चांगला परतावा देईल.