Sameer Panditrao
इन्ट्रोव्हर्ट व्यक्ती एकटेपणातून ऊर्जा मिळवतात. शांत वातावरणात राहणे, विचार करणे आणि स्वतःसोबत वेळ घालवणे त्यांना आवडते.
मोठ्या गटात वेळ घालवल्यानंतर Introverts थकतात, पण एकटे राहिल्यावर किंवा शांत ठिकाणी ते पुन्हा फ्रेश होतात.
इन्ट्रोव्हर्टसना कमी लोक पण खोल नाती आवडतात. मोठ्या ग्रुपपेक्षा एक-दोन जवळच्या व्यक्तींशी संवाद त्यांना अधिक महत्त्वाचा वाटतो.
उथळ गप्पांपेक्षा इन्ट्रोव्हर्टना अर्थपूर्ण, विचारपूर्वक चर्चा करायला जास्त आवडते. ते बोलण्याआधी विचार करतात.
इन्ट्रोव्हर्ट बहुतेक वेळा शांत, निरीक्षक, स्वतंत्र विचारांचे असतात. ते सभोवतालच्या गोष्टी खोलवर समजून घेतात.
शांत मनामुळे इन्ट्रोव्हर्ट कला, लेखन, कल्पक विचार यामध्ये अनेकदा खूप सर्जनशील असतात.
इन्ट्रोव्हर्ट म्हणजे लाजाळू किंवा एकाकी असतात असे नाही. त्यांना शांतता, आत्मपरीक्षण आणि मोजके संबंध महत्त्वाचे वाटतात.