Sameer Amunekar
आता काही सेकंदात डीपफेक व्हिडिओ तुम्हाला शोधता येणार आहे. कारण मॅकॅफीचा एआय चालित डीपफेक डिटेक्टर भारतात लाँच झालाय.
हे डिपफेक डिटेक्टर 499 रुपयात खरेदी करु शकता. पण जर तुम्हाला McAfee+ चा संपूर्ण सुरक्षा पॅक घ्यायचा असेल त्या त्यासाठी तुम्हाला 2 हजार 398 रुपय मोजावे लागतील.
सायबरसुरक्षा क्षेत्रातील दिग्गज कंपनी मॅकॅफीनं भारतात त्यांचं एआय-चालित डीपफेक डिटेक्टर लाँच केलं आहे.
बनावट व्हिडिओ आणि ऑडिओ ओळखायचे असतील तर, हे नवीन टूल तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतं.
हे टूल तुमच्या गोपनीयतेची देखील पूर्ण काळजी घेतं. जर तुम्हाला ऑडिओ डिटेक्शन फीचर बंद करायचं असेल तर तुम्हाला तो पर्याय देखील मिळेल.
बनावट व्हिडिओ, कंटेंटचा त्रास होत असेल, तर मॅकॅफीचे हे नवीन टूल तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतं.