Sameer Amunekar
'सनम तेरी कसम' या बॉलिवूड चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री मावरा होकेननं अभिनेता अमीर गिलानीबरोबर लग्न केलं आहे.
लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये मावरा आणि तिचा पती अमीर खूप सुंदर दिसत आहे.
लग्नाचे फोटो शेअर करताना या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, 'आणि आयुष्याच्या या धावपळीच्या काळात तू मला सापडलास. बिस्मिल्लाह 5.2.25.'
मावरा आणि अमीरच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर तिनं हलक्या हिरव्या रंगाचा भरतकाम केलेला लेंहगा परिधान केला आहे. तर अमीरनं काळा कुर्ता-पायजमा घातला आहे.
मावरा होकेन तिच्या अभिनय कौशल्यासोबतच फॅशन स्टाइल मुळे प्रसिद्ध आहे.
'सनम तेरी कसम' सिनेमातील सरुच्या भूमिकेनं प्रसिद्ध झालेली अभिनेत्री मावरा होकेनने लग्नाचे फोटो पोस्ट करुन सर्वांना सुखद धक्का दिलाय.