Manish Jadhav
वेस्ट इंडिजच्या 23 वर्षीय मॅथ्यू फोर्डने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकले.
आयर्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मॅथ्यू फोर्डने अवघ्या 16 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
फोर्डने आयर्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने 305 च्या स्ट्राईक रेटने धावा जोडल्या. 19 चेंडूंच्या त्याच्या खेळीत फोर्डने 2 चौकार आणि 8 उत्तुंग षटकार मारले.
फोर्डने 50 षटकांच्या फॉर्मेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याच्या एबी डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी केली.
आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मॅथ्यू फोर्डचा जलवा पाहायला मिळाला. त्याने 19 चेंडूंच्या खेळीत 58 धावा जोडल्या. फोर्डने 2 चौकार आणि 8 उंच षटकार मारले. 305 च्या स्ट्राईक रेटने त्याने शानदार खेळी खेळली.
मॅथ्यू फोर्डने वेस्ट इंडिजसाठी एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. फोर्डने ख्रिस गेलचा विक्रम मोडला.