गोमन्तक डिजिटल टीम
चतुर्थी म्हटलं की गोवेकरांच्या मनात उत्साह निर्माण होतो.
जवळपास नऊ ते आकरा दिवस चालणाऱ्या या उत्सवातील दीड दिवसाच्या बाप्पाचे काल विसर्जन करण्यात आले.
माटोळी शिवाय गोव्यातील चतुर्थी अपूर्ण असते. जवळपास मिळणाऱ्या फळ-भाज्यांनी लोकं माटोळी सजवतात.
चतुर्थीच्या काही दिवस आधी बाजारामध्ये विक्रेते अशा फळ-भाजा विकतात.
काहीवेळा माटोळीला अनुसरून बाप्पासमोर नवस केला जातो, आणि इच्छापूर्ती नंतर नवस पूर्ण केला जातो.
काहीवेळा स्थानिक कलाकार माटोळीमधून विविध निर्मिती करतात आणि स्पर्धांमधून अशा कलाकृतींचा गौरव केला जातो.
दरवर्षी माटोळीमधून कलाकार पांडुरंग, शिवलिंग, श्रीगणेश इत्यादी आकृती साकार करतात.