गोमन्तक डिजिटल टीम
माती आणि घोरपडीच्या कातडीपासून बनविलेले घुमट हे गोव्यातील पारंपरिक वाद्य आहे.
घुमट आरती शिवाय गोव्यातील गणेश चतुर्थी पूर्णच होत नाही.
४५० वर्षांच्या पोर्तुगीजांच्या जाचक राजवटीतसुद्धा घुमट वादन गोमंतकीयांनी धैर्याने सांभाळले.
घुमट आरती म्हणण्याच्या वेगवेगळ्या पद्धती व चाली आपल्याला पाहायला मिळतात.
पूर्वी पुरुषच घुमट आरती करायचे पण आता महिला उत्साहाने पुढे येत आहे व मंडळ स्थापन करून घुमट आरत्यांमध्ये सहभागी होत आहेत.
गावात घुमट आरती म्हणणारे, घुमट वाजवणारे तरुणांचे गट दररोज वेगवेगळ्या वाड्यावर जाऊन, घरोघरी जाऊन आरती म्हणतात.
घुमट वादन शिकविण्याचे ना वर्ग आहेत ना शिकवणी. गोमंतकीयांच्या रक्तातच घुमटाचे संगीत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही