गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज! माटोळी बाजारात झुंबड

गोमन्तक डिजिटल टीम

गणेश चतुर्थी

चतुर्थीला अवघा एकच दिवस राहिला असल्याने बाजारात माटोळीसाठी लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे.

मोठ्या प्रमाणात

माटोळीचे साहित्य गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे.

पावसाची विश्रांती

पावसाने विश्रांती घेतल्याने खरेदीही चांगली होत आहे.

एकाच छताखाली साहित्य

शेतकरी रानात जाऊन माटोळीचे सामान आणतात. या बाजारात एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे साहित्य मिळते.

भरपूर वस्तू

बाजारात हरण वनस्पती, नारळाची पेंडी, कांगले, करमलाची फळे, कराणे, तोरिंगण, केवणीचे दोर, श्रीफळ तसेच अन्य साहित्य मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.

पूरक साहित्य

या बाजारात पूजा साहित्य, भाजीपाला, मिठाई, मसाले, लोणची व पापड, नारळ, फुले, मखर, पत्रावळी आणि केळीची पाने, लाकडी वस्तू, रांगोळी, सेंद्रिय गूळसुद्धा उपलब्ध असतात.

भरपूर गर्दी

माटोळी बाजारात खरेदीसाठी उसळलेल्या गर्दीने वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांना बरीच कसरत करावी लागत आहे.

आणखी पाहा