मेरी कोमबद्दल 'या' 5 गोष्टी माहित आहेत का?

Pranali Kodre

कागदोपत्री वाढदिवस

ऑलिम्पिक पदक विजेती आणि सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियनशीप जिंकलेल्या अनुभवी बॉक्सर मेरी कोम हिचा 1 मार्च रोजी कागदोपत्री वाढदिवस असतो.

Mary Kom | Instagram

खरा वाढदिवस

खरंतर मेरी कोमनेच इंडिया टूडेशी बोलताना खुलासा केला होता की तिची खरी जन्मतारिख २४ नोव्हेंबर १९८२ आहे. परंतु, तिच्या लहानपणी काकांनी तिचे फॉर्म भरत असताना चुकून 1 मार्च 1983 अशी जन्मतारिख लिहिली.

Mary Kom | Instagram

नाव

मणिपूरमधील कांगाथेई येथे मेरी कोम हिचा जन्म झाला होता. तिचे मुळ नाव मांगते चुंगनेजंग असे आहे.

Mary Kom | Instagram

प्रेरणा

भारताचे दिग्गज बॉक्सर डिंको सिंग यांच्याकडून मेरी कोमला बॉक्सिंगची प्रेरणा मिळाली आहे. तिने नरजिंत सिंग यांच्याकडून सुरुवातीला ट्रेनिंग घेतले.

Mary Kom | Instagram

6 वेळची वर्ल्ड चॅम्पियन

मेरी कोम हिने 2002, 2005, 2006, 2008, 2010 आणि 2018 साली वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धा जिंकली. तसेच 2001 मध्ये या स्पर्धेत रौप्य पदक, तर 2019 मध्ये कांस्य पदक जिंकले होते.

Mary Kom | Instagram

मोठ्या स्पर्धांमध्येही यश

याशिवाय तिने 2012 साली ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले आहे. याशिवाय तिने एशियन गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धा आणि आशियाई चॅम्पियनशीप मध्येही पदके जिंकली आहे.

Mary Kom | Instagram

प्रतिष्ठीत पुरस्कार

मेरी कोम हिला अर्जुन पुरस्कार (2004), पद्मश्री (2006) आणि राजीव गांधी खेलरत्न (2009) पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Mary Kom | Instagram

'लीप डे'ला सुरू झालेले कसोटी सामने

Test Cricket | X/ICC
आणखी बघण्यासाठी