Manish Jadhav
iQOO भारतात स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. यावेळी कंपनी भारतात iQOO Z9X लॉन्च करणार आहे.
हा स्मार्टफोन 16 मे रोजी लॉन्च केला जाईल आणि Amazon वरुन खरेदीसाठी उपलब्ध असेल.
iQOO Z9X याआधी चीनमध्ये लॉन्च करण्यात आला होता, त्यामुळे स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आधीच समोर आले आहेत. हा फोन Qualcomm Snapdragon 6 Gen 1 चिपसेट सह येणार आहे.
भारतात, हे तीन रॅम प्रकारांमध्ये 4GB + 128GB, 6GB + 128GB आणि 8GB + 128GB मध्ये ऑफर केले जाऊ शकते.
iQOO Z9x 5G च्या फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 6.72-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळू शकतो. डिव्हाइसमध्ये 120Hz रीफ्रेश रेट आणि 1,000 nits पीक ब्राइटनेस असणे अपेक्षित आहे.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास, iQOO Z9x 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल ज्यामध्ये 50MP प्रायमरी सेन्सर आणि 2MP डेप्थ लेन्स असू शकतात. फोनमध्ये 8MP सेल्फी कॅमेरा असू शकतो.
डिव्हाइसला पॉवर देण्यासाठी 6,000mAh बॅटरी मिळू शकते.
या मोबाईलच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्सास, कंपनी सुमारे 15 हजार रुपयांच्या बजेटमध्ये लॉन्च करु शकते.