Akshata Chhatre
काही पुरुष अपेक्षा करतात की पत्नीने घराची व मुलांची जबाबदारी घ्यावी आणि त्याने फक्त पैसे कमवावेत.
स्त्रीने आपलं करिअर थांबवणं ही गोष्ट अन्याय्य आहे. तिच्या महत्त्वाकांक्षांचाही विचार करणे आवश्यक आहे.
घर आणि कुटुंब ही दोघांची जबाबदारी आहे. फक्त एका व्यक्तीवर भार टाकणे योग्य नाही.
स्वावलंबी स्त्रियांमध्ये सहानुभूती नसते हा गैरसमज आहे. त्या एकाच वेळी कणखर आणि हळव्या असू शकतात.
अशा स्त्रिया त्यांच्या मूल्यांवर ठाम राहतात. त्यांना धमकावता येत नाही, पण त्या समजूतदार असतात.
तडजोड करावी लागली तरी ती परस्पर सन्मान आणि चर्चेतून व्हावी. निर्णय लादणे नको.