Sameer Panditrao
झुकरबर्ग यांनी २००४ मध्ये, अवघ्या १९ व्या वर्षी फेसबुक सुरू केले. चार वर्षांनी, २००८ मध्ये तो जगातील सर्वात तरुण 'सेल्फ-मेड' अब्जाधीश बनला.
फेसबुक तयार करण्यापूर्वी, झुकरबर्ग हार्वर्डमधील एक अत्यंत कुशल प्रोग्रॅमर म्हणून ओळखला जात असे. त्याने मानसशास्त्र आणि संगणकशास्त्राचे शिक्षण घेतले.
झुकरबर्ग आणि त्यांच्या पत्नीचे नाव Forbes च्या "अमेरिकेतील सर्वात परोपकारी अब्जाधीश" यादीत आहे. त्यांनी आतापर्यंत सुमारे २.७ अब्ज डॉलर्स दान केले आहेत.
फेसबुकच्या जन्मावर आधारित “The Social Network” हा चित्रपट झुकरबर्गवर बनवण्यात आला.
टाईम मॅगझिनने २०१० आणि २०१३ मध्ये झुकरबर्गला "Person of the Year" हा किताब दिला.
झुकरबर्गचे प्रसिद्ध ग्रे रंगाचे टी-शर्ट हे Brunello Cucinelli या डिझायनरने तयार केलेले असतात.
झुकरबर्गला फिटनेसची आवड आहे. तो आठवड्यातून किमान तीन वेळा धावायला जातो.