Sameer Panditrao
मडगावात शिमगोत्सव चित्ररथ मिरवणूक उत्साहात पार पडली.
ओस्सय...ओस्सयच्या गजरात, गोपाळा गोपाळा या पारंपारिक गीतांनी नगरी दुमदुमली.
घोडेमोडणी, धनगर नृत्य कुणबी नृत्य आदी लोकनृत्यांचा सुरेख आविष्कार लोकांना पाहायला मिळाला.
भव्यदिव्य स्वयंचलित चित्ररथ देखाव्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले.
पारंपरिक वेशभूषा डोक्यावर रंगबेरंगी फेटे, चौरंग, अबदागिरे सुर्यपाने, छत्र्या, हातात गुढ्या, समोर तोरण व ढोल ताशे व पदन्यास करीत रोमटामेळ सादर केला.
उपस्थित लोकांनीही उस्फूर्त दाद दिली. मिरवणूक बघण्यासाठी लोकांनी दुतर्फा गर्दी केली होती. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.