Sameer Amunekar
मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने खास कोळी लूकमध्ये एक आकर्षक फोटोशूट केले असून, सध्या तिच्या या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
पारंपरिक कोळी साजशृंगारात तेजस्विनी अतिशय देखणी दिसत आहे. या फोटोशूटसाठी तिने पिवळ्या रंगाची साडी आणि जांभळ्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.
तेजस्विनी लोणारीने पारंपरिक पेहरावाला सोन्याचे दागिने, नथ, कंबरेला कंबरपट्टा आणि पारंपरिक गजरा यांचा सुंदर साज दिला आहे.
फोटोशूट तिने अलिबागच्या रम्य समुद्रकिनारी केले असून, पार्श्वभूमीला निळाशार समुद्र, वाळूचा किनारा आणि मंद समुद्री वाऱ्याची चाहूल यामुळे या छायाचित्रांना अधिकच सुंदरता प्राप्त झाली आहे.
पारंपरिक संस्कृती, सणाचा उत्साह आणि समुद्राशी असलेलं नातं यांचा संगम असलेला तेजस्विनीचा हा लूक चाहत्यांच्या मनात विशेष ठसा उमटवतो आहे.
तेजस्विनीच्या या फोटोशूटमुळे नारळी पौर्णिमेचा सांस्कृतिक आणि भावनिक महत्त्व अधोरेखित होत
पारंपरिक पोशाख आणि दागिन्यांच्या देखण्या सादरीकरणामुळे कोळी संस्कृतीचे सौंदर्यही अधिक उजळून दिसत आहे.