सफरचंद खाल्ल्याने खरंच ब्लड शुगर वाढते का? जाणून घ्या सत्य

Sameer Amunekar

नैसर्गिक साखर

सफरचंदात फ्रुक्टोज नावाची नैसर्गिक साखर असते, जी जास्त प्रमाणात खाल्ल्यास ब्लड शुगर वाढवू शकते.

Apple | Dainik Gomantak

ग्लायसेमिक इंडेक्स कमी

सफरचंदाचा ग्लायसेमिक इंडेक्स साधारण 36-40 असल्याने ते हळूहळू साखर सोडते, त्यामुळे अचानक शुगर लेव्हल वाढत नाही.

Apple | Dainik Gomantak

फायबर

सफरचंदातील सोल्यूबल फायबर (पेक्टिन) पचन मंदावते आणि साखरेचे शोषण हळूहळू होते, त्यामुळे शुगर कंट्रोलमध्ये मदत होते.

Apple | Dainik Gomantak

मधुमेहींसाठी योग्य प्रमाण महत्त्वाचे

डायबिटीज असणाऱ्यांनी दिवसातून १ मध्यम आकाराचे सफरचंद खाल्ले तर ते सुरक्षित मानले जाते.

Apple | Dainik Gomantak

ज्यूस टाळावा

सफरचंदाचा रस (apple juice) फायबर कमी असल्याने ब्लड शुगर पटकन वाढवतो, त्यामुळे मधुमेहींनी तो टाळावा.

Apple | Dainik Gomantak

सालासह फळ खावं

सोलून किंवा प्रोसेस केलेले सफरचंद न खाता सालासह ताजे फळ खाल्ले तर शुगरवर कमी परिणाम होतो.

Apple | Dainik Gomantak

इतर आहारासोबत खावे

सफरचंद प्रथिने किंवा हेल्दी फॅट्ससोबत खाल्ल्यास ब्लड शुगर वाढण्याचा वेग आणखी कमी होतो.

Apple | Dainik Gomantak

महिलांना जास्त कंटाळा का येतो?

Women | Dainik Gomantak
येथे क्लिक करा