Sameer Amunekar
मराठ्यांची सत्ता आणि पराक्रम आजच्या पाकिस्तानातील सिंधू नदीकाठी असलेल्या अटकेच्या किल्ल्यापर्यंत पोहोचला होता.
थोरले तुकोजी होळकर आणि साबाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पेशवे रघुनाथराव यांच्या मोहिमेदरम्यान मराठ्यांनी हा किल्ला जिंकला.
या भव्य विजयामुळेच मराठ्यांच्या धाडसाची आणि विस्ताराची साक्ष देणारी ‘अटकेपार झेंडे’ ही ऐतिहासिक म्हण प्रचलित झाली.
अटकेचा किल्ला सिंधू नदीच्या काठी, आजच्या पाकिस्तानमध्ये स्थित असून तो सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो.
या विजयामुळे मराठा साम्राज्याचा विस्तार अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत पोहोचला आणि पराक्रमाचा सर्वोच्च मापदंड ठरला.
अटकेचा किल्ला सम्राट अकबराने इ.स. १५८३ मध्ये बांधला होता. पुढे तो अनेक शतकं सामरिक दृष्ट्या केंद्रबिंदू ठरला.
अटकेवरील मराठ्यांचा विजय हा केवळ लष्करी यश नव्हता, तर मराठा साम्राज्याच्या गौरवगाथेत एक अभिमानास्पद सुवर्णपान ठरला.