Sameer Panditrao
गोव्याचा पोर्तुगीज व्हॉइसरॉय फ्रान्सिस्को डी ताव्होर कोंदि द आल्व्होर याला मुघल मराठे संघर्षातून स्वतःचा फायदा करून घ्यावयाचा होता.
दक्षिण कोकणचा प्रदेश गोव्यास जोडणे हा पोर्तुगिजांचा फार जुना हेतू होता. व्हॉइसरॉय कोंदि द आल्व्होर याची वागणूक त्या धोरणाला अनुसरूनच होती.
पोर्तुगीज व मुघल यांच्यातील तहामुळे छत्रपती संभाजी राजांनीही आपले सामोपचाराचे धोरण बदलून चढाईचे धोरण स्वीकारले. यातूनच पुढे पोर्तुगीज-मराठा युद्ध सुरू
पोर्तुगिजांनी फोंडा कोट जिंकण्यासाठी आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला आधीच सुरक्षित केला.
फोंड्याचा वेढा उठविल्यानंतर मराठ्यांच्या एका तुकडीने जुवे बेटावरून सांत इस्तेव्हाववर हल्ला केला.
व्हॉइसरॉय कोंदि द आल्व्होरने ४०० शिपायांसह जुवे बेटावर कूच केले. मराठ्यांनी पोर्तुगिजांवर जोराचा हल्ला केला.
यात मराठ्यांकडील घोडेस्वारांनी व्हॉइसरॉयवर हल्ला केला आणि त्याच्या तोंडचे पाणी पळवले, त्याला पळताभुई थोडीच केली.