Offbeat Beaches: अथांग निळाई, पांढरी शुभ्र वाळू, डोळ्यांचं पारणं फेडणारं स्वप्नवत सौंदर्य, 'हे' मौल्यवान रत्न दुर्मिळ पक्षी-फुलपाखरांचं विश्व

Manish Jadhav

शांतता आणि निसर्गसौंदर्य

केरळमधील अलाप्पुझा जिल्ह्यातील इतर गर्दीच्या समुद्रकिनाऱ्यांच्या तुलनेत मरारी हा अत्यंत शांत आणि निसर्गरम्य किनारा आहे. येथील पांढरी शुभ्र वाळू आणि नारळाच्या झाडांची दाट सावली पर्यटकांना एका वेगळ्याच जगात घेऊन जाते.

marari beach | Dainik Gomantak

'मरारीकुुलम' वरुन नाव

हा समुद्रकिनारा 'मरारीकुलम' या छोट्याशा मासेमारी गावाजवळ वसलेला आहे. त्यामुळेच याला 'मरारी' असे नाव पडले असून येथे आजही पारंपरिक मल्याळी संस्कृतीचे दर्शन घडते.

marari beach | Dainik Gomantak

पारंपरिक मासेमारी

मरारी हे आजही एक सक्रिय मासेमारी केंद्र आहे. पहाटेच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर स्थानिक मच्छीमार त्यांच्या पारंपरिक बोटींनी मासेमारी करताना पाहणे हा एक अद्भूत अनुभव असतो.

marari beach | Dainik Gomantak

जैवविविधता

या किनाऱ्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जैवविविधता पाहायला मिळते. येथे अनेक प्रकारचे दुर्मिळ पक्षी, फुलपाखरे आणि विविध प्रकारची फुले आढळतात, ज्यामुळे निसर्गप्रेमींसाठी हे एक उत्तम ठिकाण ठरते.

marari beach | Dainik Gomantak

आयुर्वेदिक केंद्र आणि रिसॉर्ट्स

मरारी समुद्रकिनाऱ्याच्या आसपास अनेक जागतिक दर्जाचे आयुर्वेदिक केंद्र आणि इको-फ्रेंडली रिसॉर्ट्स आहेत. येथे पर्यटक 'आयुर्वेदिक स्पा' आणि योगाभ्यासाचा आनंद घेण्यासाठी जगभरातून येतात.

marari beach | Dainik Gomantak

स्वच्छता आणि इको-टूरिझम

या किनाऱ्याला केरळमधील सर्वात स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांपैकी एक मानले जाते. येथील इको-टूरिझम उपक्रमांमुळे पर्यावरणाचे रक्षण करण्यावर मोठा भर दिला जातो.

marari beach | Dainik Gomantak

जवळील आकर्षण

मरारीपासून हाकेच्या अंतरावर अलाप्पुझाचे प्रसिद्ध 'बॅकवॉटर्स' आहेत. त्यामुळे पर्यटकांना एकाच वेळी अथांग समुद्र आणि संथ बॅकवॉटर्समधील हाऊसबाेट सफरीचा आनंद घेता येतो.

marari beach | Dainik Gomantak

Belapur Fort: नवी मुंबईचा 'रॉयल' वारसा अन् चिमाजी अप्पांचा 'तो' ऐतिहासिक विजय... 500 वर्षांचा बेलापूर किल्ल्याचा धगधगता इतिहास

आणखी बघा