Manish Jadhav
पावसाळ्यात दररोज पालक ज्यूस प्यायल्याने शरीरात सकारात्मक फरक दिसून येतो.
व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स यांचा समावेश असलेली पालक ही आरोग्यदायी भाजी आहे.
पालकातील पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी पालक ज्यूस उपयुक्त ठरतो.
पालक हा लोहाचा चांगला स्रोत आहे. लोहामुळे शरीरात लाल रक्तपेशी वाढतात. त्यामुळे पावसाळ्यात आवर्जून पालक ज्यूस प्यावा.
पालकात भरपूर फायबर असते, ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते.
पालकात व्हिटॅमिन K आणि कॅल्शियम मुबलक असते. त्यामुळे हाडे मजबूत होतात.
पालकातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला ताजेलदार बनवतात.
पालकात कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असते. त्यामुळे भूक कमी लागते.