Sameer Amunekar
हिंदी सिनेमा विश्वातील दिग्गज अभिनेते मनोज कुमार यांचं आज (४ एप्रिल) निधन झालं आहे. त्यांच्या निधनानं बॉलिवूड कलाविश्वात शोककळा पसरली आहे. जाणून घेऊया त्यांच्या गाजलेल्या सिनेमांबद्दल
९७६ साली प्रदर्शित झालेला 'दस नंबरी' हा चित्रपट अभिनेते मनोज कुमार यांच्या प्रमुख भूमिकेमुळे विशेष गाजला. या चित्रपटात हेमा मालिनी यांनी अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. या सिनेमाने तब्बल १४.७१ कोटी रुपयांची कमाई केली.
मनोज कुमार यांच्या फिल्मी कारकिर्दीतील आणखी एक गाजलेला सिनेमा म्हणजे ‘क्रांती’. १९८१ साली प्रदर्शित झालेल्या या ऐतिहासिक पटाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. या चित्रपटाने भारतामध्ये १० कोटी रुपयांची आणि जगभरात मिळून १६ कोटी रुपयांची कमाई केली.
१९७४ साली प्रदर्शित झालेला मनोज कुमार यांचा ‘रोटी कपड़ा और मकान’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात खोलवर घर करून गेला. या सिनेमाने भारतात ५.२५ कोटींची कमाई केली.
मनोज कुमार यांच्या 'पूरब और पश्चिम' सिनेमानं देखील चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. या सिनेमाने 4 कोटी 50 लाख रुपयांची कमाई केली.
1967 साली प्रदर्शित झालेल्या 'उपकार' सिनेमाने 3.50 कोटींची कमाई केली होती.