Sameer Amunekar
मालवण, वेंगुर्ला, रेडी या बंदरांवरून घाटावर जाणाऱ्या मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी मनोहर-मनसंतोषगड उभारला गेला.
११ एप्रिल ते १५ जून १६६७ या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी तब्बल ३४ दिवसांचा मुक्काम मनोहर गडावर केला.
मनोहर गडावर पूरातन अवशेष असून तो चढण्यास सोपा आहे, तर मनसंतोष गड हा सुळक्यासारखा असून चढण्यासाठी आता पायर्यांची सोय करण्यात आलीय.
१८३४ व नंतर वारंवार गडकर्यांनी बंड केले. १८३६ मध्ये छ. शहाजी महाराज (बुवा महाराज) स्वतः गडावर येऊन बंड मोडून काढले.
फोंड सावंत तांबूळकराच्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरुद्ध येथे जोरदार बंड झाले. बंडखोरांनी युवराज अनासाहेबांना गडावर आणून ठेवले व दारूगोळा तयार करण्याचा कारखाना सुरू केला.
२६ जानेवारी १८४५ रोजी इंग्रजांच्या तोफांच्या माऱ्याने गडाची तटबंदी भग्न झाली. बंडखोरांनी गड सोडला आणि इंग्रजांनी गडाच्या पायऱ्या उध्वस्त केल्या.
मनोहर-मनसंतोषगडाला भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा ये-जा असते.