Sameer Amunekar
कोकण म्हणजे नैसर्गिक सौंदर्याची खाण. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायचा असेल तर कोकणातील प्रत्येक जिल्हा, प्रत्येक गाव खास आहे.
त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याची सफर केली तर सावंतवाडी हा एक आकर्षक ठिकाणांचा खजिना आहे.
सावंतवाडी म्हटलं की येथे अनेक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटनस्थळं पाहायला मिळतात.
कपल्ससाठी खास स्पॉट म्हणायचं झालं तर मोती तलाव हे ठिकाण अगदी परफेक्ट आहे.
सावंतवाडीच्या मध्यवस्तीत वसलेला मोती तलाव हा ऐतिहासिक वारसा आहे.
तलावाच्या काठावर संध्याकाळी बसून थंड गार वाऱ्यात गप्पा मारणं, शांततेचा अनुभव घेणं हे खूपच रोमँटिक ठरतं. तलावाच्या सभोवताली हिरवाईने नटलेलं वातावरण कपल्सना आकर्षित करतं.
तलावाच्या पाण्यात दिसणारे आकाशाचे प्रतिबिंब, संध्याकाळी उजळणारे लाईट्स आणि त्यात निर्माण होणारी शांतता मनाला एक वेगळीच शांती देते.