Sameer Amunekar
मालवण, वेंगुर्ला, रेडी बंदरात उतरणारा माल आंबोली व हणमंत घाटमार्गे घाटमाथ्यावरील बाजारपेठांकडे जात असे. या मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी 'मनोहर-मनसंतोष' गड उभारण्यात आला.
मनोहर-मनसंतोष गड हे दोन्ही किल्ले एकमेकांपासून खिंडीमुळे वेगळे झाले असून आजही त्यांचे पुरातन अवशेष दिमाखात उभे आहेत.
या किल्ल्यांचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे तब्बल एक महिना मुक्काम केला होता, जो स्वराज्याच्या इतिहासात महत्त्वाचा मानला जातो.
तारकर्ली–देवबाग येथे समुद्राला मिळणाऱ्या कर्ली नदीचा उगम याच किल्ल्यांच्या परिसरात होतो आणि ही नदी सुमारे ४८ किमी अंतर पार करून समुद्राला मिळते.
मनोहर गडावर प्राचीन अवशेष असून तो चढण्यास सोपा आहे, तर मन्संतोष गड सुळक्यासारखा असून त्यावर जाण्यासाठी प्रस्तरारोहण करावे लागते.
पावसाळ्याचे चार महिने वगळता वर्षभर पर्यटकांना या गडावर जाता येते, कारण हे किल्ले आंबोली घाट परिसरात आहेत.
आग्र्यातून सुटका झाल्यानंतर शिवाजी महाराज १३ मे १६६७ रोजी मनोहर गडावर दाखल झाले व १५ जून १६६७ पर्यंत म्हणजेच ३४ दिवस येथे मुक्काम करून गडाची डागडूजी व फेररचना केल्याचे मानले जाते.