Sameer Amunekar
मानकुराद आंबा हा गोव्याचा सर्वात प्रसिद्ध आणि चविष्ट आंबा मानला जातो. याला गोव्याचा राजा असंही संबोधलं जातं.
मानकुराद आंब्याची गोडसर चव, मऊ आणि रसाळ गर, पातळ साल आणि मोहक सुगंध यामुळे तो इतर आंब्यांपेक्षा वेगळा आणि खास मानला जातो.
मानकुराद आंबा हा त्याच्या अतिशय गोडसर चवीसाठी प्रसिद्ध आहे. इतर आंब्यांच्या तुलनेत त्यामध्ये अल्फोन्सोप्रमाणे गोडसरपणा असतो.
मानकुराद आंब्याची साल पातळ आणि गुळगुळीत असते, त्यामुळे तो सहज सोलता येतो आणि खाण्यास सोपा असतो. साल कापण्याची गरज नाही; हाताने सहज निघते.
मानकुराद आंब्याचा रंग हा गडद पिवळसर आणि मोहक असतो, त्यामुळे तो सहज ओळखता येतो. मानकुराद आंबा केशरी-पिवळ्या छटेने नटलेला, ज्यामुळे तो आणखी मोहक दिसतो.
मानकुराद आंबा त्याच्या नैसर्गिक सुगंधासाठी देखील प्रसिद्ध आहे. आंब्याच्या गरातून आणि सालीतून एकसंध गोडसर वास येतो. पूर्ण पिकलेल्या आंब्यातीन सुगंध जास्त येतो.