Akshata Chhatre
आंब्याच्या पानांचाही केसांच्या आरोग्यात मोठा वाटा आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?
आजच्या घडीला केसगळती, केसांची वाढ थांबणे, कोरडं स्कॅल्प आणि डॅंड्रफ अशा समस्यांनी जवळजवळ प्रत्येकालाच त्रास होतो.
बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर काहीसा तात्पुरता फायदा देतो, पण दीर्घकाळ वापरल्यास त्याचे दुष्परिणाम दिसू शकतात.
अशा वेळी नैसर्गिक उपायच सुरक्षित आणि प्रभावी ठरतात आणि यात आंब्याच्या पानांचा वापर एक सोपं पण प्रभावी घरगुती समाधान ठरू शकतो.
१५–२० पाने २–३ कप पाण्यात उकळा. पाणी अर्धं होईपर्यंत उकळून घ्या आणि गाळून थंड करा. शॅम्पूनंतर हे पाणी केसांवर ओता आणि तसेच सोडा, पुन्हा धुवू नका.
१०–१५ पाने खोबरेल तेलात किंवा ऑलिव्ह ऑईलमध्ये मंद आचेवर उकळा. पाने काळपट होईपर्यंत उकळून थंड करून गाळा. हे तेल आठवड्यातून २ वेळा मुळांमध्ये चोळा आणि १–२ तास ठेवून धुवा.