Manish Jadhav
पावसाळ्यात गोव्याचं निसर्ग सौंदर्य खुलंत. पावसाळ्यात गोव्यात पर्यटक मोठी गर्दी करतात. यादरम्यान तुम्ही मंगेशीचं मंदिर नक्की पाहिलं पाहिजे.
गोव्यात येणारा पर्यटक आवर्जून ऐतिहासिक महत्त्व प्राप्त असलेली हिंदू मंदिरे पाहतो. आज आपण मंगेशी मंदिराविषयी जाणून घेणार आहोत.
गोव्याची राजधानी पणजीजवळ उभारलेले मंगेशी मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे.
मोंगरी डोंगरातील हे मंदिर 18 व्या शतकात निर्माण करण्यात आले होते.
जाणकारांच्या मते, मंदिराला पोर्तुगालांच्या हल्ल्यापासून वाचविण्यासाठी शिवलिंगला मूळ मंदिरातून प्रियोळ येथे करण्यात स्थलांतरित केले होते.
मंगेशी मंदिराची विशेष अशी वास्तुकला आहे. हे मंदिर गोव्यातील शांतादुर्गा मंदिराच्या शैलीत तयार करण्यात आले आहे. हे मंदिर 450 वर्ष जुने असल्याचे मानले जाते.