Akshata Chhatre
गोव्यात वेळोवेळी आपल्याला संस्कृती जपलेली पाहायला मिळते. गोव्यात लोकं प्रचंड श्रधाळू आहेत आणि ते आजही संस्कृती जपून आहेत.
फोंड्यात इतर भागांच्या तुलनेत फार अधिक मंदिरं पाहायला मिळतात, यांपैकीच एक म्हणजे मंगेशीचं देऊळ.
या मंगेशच्या मंदिरात शुक्रवारी (दि.१६) आंब्यांची आरास तयार केली होती.
सर्व महाजन, भक्त, ग्रामस्थ, सेवेकरी व देवस्थान कमिटी तर्फे आम्रफळ पूजा करण्यात आली.
सध्या या पूजेचे फोटोज सगळीकडे पाहायला मिळतायत, केवळ वर्षातून एकदा मिळणाऱ्या या फळाने सुशोभीकरण केले जाते.
आंब्यांची ही आरास म्हणजे एकार्थाने निसर्गचे स्मरण किंवा निसर्गाप्रती कृतज्ञताच आहे.