Akshata Chhatre
झाडंही एकमेकांशी "बोलतात" होय, ती भूमिगत संवाद साधतात! वाचून आश्चर्य वाटलं ना?
झाडांच्या मुळांशी जोडलेली मायकोरायझाएक नेटवर्क तयार करते जसं की मातीतील इंटरनेट.
मोठी, जुनी झाडं लहान रोपांना पोषणद्रव्यं पाठवून त्यांना वाढू देतात.
झाडं एकमेकांना धोका कळवतात. कोणत्याही झाडावर कीटकांचा हल्ला झाला, तर ती इतर झाडांना सावध करतात.
आरोग्यदायी झाडं आजारी झाडांना साखर आणि पोषणद्रव्यं पाठवतात. फक्त एकाच प्रकारची नाही वेगवेगळ्या प्रजातींची झाडंही एकमेकांना मदत करतात.
वनतोड, प्रदूषण आणि जमिनीचे नुकसान हे निसर्गाच्या या अदृश्य संवादावर घातक परिणाम करतात.