Sameer Amunekar
मल्हारगड हा मराठ्यांनी बांधलेला शेवटचा किल्ला मानला जातो.
सन 1763 ते 1765 या कालावधीत पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख भीमराव पानसे व कृष्णराव पानसे यांनी हा किल्ला बांधला.
पुणे शहरापासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर, सासवडच्या मार्गावर दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली गेली.
किल्ला साधारण त्रिकोणी आकाराचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकाराचा तट आहे.
सन 1771-72 मध्ये थोरले माधवराव पेशवे मल्हारगडावर आले होते, याचा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आहे.
किल्ला लहान असला तरी गडावरून आजूबाजूच्या डोंगररांगा व निसर्गाचे अफाट रूप अनुभवता येते.
दिवेघाटावर लक्ष ठेवणे आणि पुणे-सासवड मार्गाचे रक्षण करणे हा मल्हारगड बांधण्यामागचा मुख्य उद्देश होता.