Puja Bonkile
फळांपासून तुम्ही नैसर्गिक ब्लश बनवू शकता आणि मेकअप केल्यानंतर वापरू शकता. हे पूर्णपणे नैसर्गिक दिसते आणि चेहऱ्याला एक वेगळी चमक देते.
जर तुम्हाला तुमचा मेकअप नैसर्गिक दिसायचा असेल तर बाजारातील ब्लशऐवजी घरी बनवलेले नैसर्गिक ब्लश वापरा.
बीटरूटपासून 100% नैसर्गिक ब्लश घरी सहज बनवता येते.
बीटरूट ब्लश चेहऱ्यावर लावल्याने रंग सुधारतो. तुमचे गाल निरोगी आणि गुलाबी करण्यासाठी, तुम्ही बीटरूट ब्लश वापरू शकता.
जर तुम्हाला तुमच्या गालावर हलका पीच रंग हवा असेल, तर गाजरापासून बनवलेले होममेड नैसर्गिक ब्लश तुमच्यासाठी योग्य असेल.