Manish Jadhav
वापरुन उरलेली चहापत्ती स्वच्छ धुवून वाळवावी. ही चहापत्ती कुंडीतील मातीत मिसळल्यास झाडांना भरपूर नायट्रोजन मिळते आणि वाढ वेगाने होते.
केळीच्या सालीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. ही साली वाळवून त्याची पावडर मातीत टाकल्यास झाडांना फुले व फळे भरपूर येतात.
अंड्याची टरफले बारीक कुटून मातीत घातल्यास झाडांना कॅल्शियम मिळते. यामुळे झाडांचे खोड मजबूत होते आणि पाने पिवळी पडणे थांबते.
कांद्याची साले 2-3 दिवस पाण्यात भिजवून ठेवावीत. हे पाणी गाळून झाडांना दिल्यास वनस्पतींना आवश्यक पोषण मिळून वाढ सुधारते.
स्वयंपाकघरात उरलेल्या भाज्यांच्या देठ व सालांपासून घरीच उत्तम कंपोस्ट (सेंद्रिय खत) बनवता येते, जे मातीची सुपीकता वाढवते.
पाणी मिसळलेले पातळ ताक झाडांच्या मुळांशी घातल्यास मातीतील सूक्ष्मजीव सक्रिय होतात आणि बुरशीजन्य आजारांपासून झाडांचा बचाव होतो.
तांदूळ किंवा डाळी धुताना उरलेले पाणी फेकून न देता झाडांना घालावे. या पाण्यातील खनिजांमुळे झाडांना ताजी ऊर्जा मिळते.