Sameer Amunekar
मैद्यामध्ये तेल किंवा तूप थोडं जास्त (मैद्याच्या 1/4 भागाएवढं) घाला. मोयन घट्ट असेल तरच समोसे कुरकुरीत होतात.
पीठ कधीही सैल मळू नका. घट्ट पीठामुळे समोसे तेलात फुगत नाहीत आणि कवच खुसखुशीत राहतं.
मळलेलं पीठ किमान 20–25 मिनिटं ओल्या कपड्याखाली ठेवा. यामुळे समोशाचं कवच व्यवस्थित बसतं.
गरम भराव भरल्यास समोसे फुटतात. बटाट्याचा मसाला पूर्ण थंड झाल्यावरच समोसे भरा.
तेल खूप गरम नको. मध्यम ते कमी आचेवर समोसे तळल्यास आतून नीट शिजतात आणि बाहेरून कुरकुरीत होतात.
पहिल्या 2–3 मिनिटांत समोसे हलवू नका. त्यामुळे कवच नीट सेट होतं आणि फुटत नाही.
आधी समोसे फिकट रंग येईपर्यंत तळून काढा. थंड झाल्यावर पुन्हा गरम तेलात तळा—एकदम मार्केटसारखी कुरकुरीतपणा मिळतो!