Sameer Amunekar
कोकण म्हटले की डोळ्यांसमोर उभा राहतो तो निळाशार समुद्र, नारळ-सुपारींच्या बागा, शांत वातावरण आणि निसर्गाची मुक्त उधळण.कोकण प्रदेश समुद्रकिनाऱ्यांसाठी विशेष ओळखला जातो.
निसर्गरम्य शांतता, स्वच्छ किनारा आणि ऑलिव्ह रिडले कासवांसाठी प्रसिद्ध असलेला वेलास बीच गर्दीपासून दूर राहू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम आहे.
डोंगर आणि समुद्र यांचा सुरेख संगम अनुभवायचा असेल, तर आरे-वारे बीच नक्की भेट द्या. येथे सूर्यास्ताचा नजारा मन मोहून टाकतो.
निळे पाणी, मऊ वाळू आणि शांत वातावरण यामुळे भाट्ये बीच अजूनही अनेकांसाठी एक सीक्रेटच आहे.
घनदाट झाडे, स्वच्छ वाळू आणि कमी पर्यटक यामुळे हा बीच खऱ्या अर्थाने निसर्गप्रेमींसाठी खास आहे.
निवती किल्ल्याच्या सान्निध्यात असलेला हा बीच ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्याचा दुर्मिळ संगम दाखवतो.
लांबच लांब पसरलेला केळशी बीच शांतता, निवांतपणा आणि नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्यासाठी परफेक्ट आहे.