Akshata Chhatre
दिवसाला २५ ते ३० केस गळणे सामान्य आहे. पण त्यापेक्षा जास्त केस कंगव्यात येत असतील, तर याकडे दुर्लक्ष करू नका.
बाजारातील शॅम्पू आणि कंडिशनर्स तात्पुरता फायदा देतात, पण दीर्घकाळात ते केसांचा पोत खराब करतात.
फक्त आवळा आणि नारळ तेल वापरून तुम्ही घरीच एक प्रभावी हेअर ऑईल तयार करू शकता.
आवळा कापून नारळ तेलासह मिक्सीमध्ये वाटून घ्या. कढईत नारळ तेल गरम करून ही पेस्ट त्यात मिसळा.
हे मिश्रण मंद आचेवर तोपर्यंत शिजवा जोपर्यंत आवळ्याचा रंग तपकिरी (Brown) होत नाही.
हे तेल आठवड्यातून २-३ वेळा वापरा. केस धुण्यापूर्वी किमान २ तास आधी केसांच्या मुळांना हलक्या हाताने मसाज करा.
हे तेल १ ते २ महिने आरामात टिकते. नियमित वापरामुळे केस गळणे थांबून ते दाट आणि लांब होतात.