Digital Detox: दररोजच्या कामाचा ताण आलाय? मग भरा बॅग आणि निघा गोव्याला!!

गोमन्तक डिजिटल टीम

कंटाळला आहात?

दररोजच्या कामाला कंटाळला आहात का? आठ तासांचं काम आणि स्क्रीन टाइमचा प्रचंड कंटाळा आला असेल तर सरळ बॅग भरा आणि गोव्याला निघा.

स्ट्रेस घालवायचा पर्याय

आपल्यापैकी अनेकजण दर दिवशी कामाला जुंपून जातात आणि त्यांनतर स्ट्रेस वाढतो. हाच स्ट्रेस जर का घालवायचा असेल तर गोवा उत्तम पर्याय ठरू शकतो.

समुद्र

गोवा हा समुद किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. शांत समुद्रात निवांत चालणं यात देखील एक वेगळीच मजा असते.

शांतता

गोव्यातील गावांमध्ये असलेली शांतताच आपण शहराच्या विविध भागांमध्ये शोधात असतो.

मानसिक आरोग्य

काम आणि करियर जेवढं महत्वाचं आहे तेवढंच आपला मानसिक आरोग्य. हो ना? मग जर का दररोजच्या कमला कंटाळला असाल तर थोडा वेळ काढून घ्या स्वतःसाठी जागून घ्या.

स्थानिकांशी संवाद

गोव्यात तुम्हाला स्थानिकांशी संवाद साधण्याची संधी मिळेल, अनेक पदार्थ चाखायला मिळतील आणि यामुळेच दररोजच्या आयुष्यापेक्षा काहीतरी वेगळं जगणायची अनुभवायला मिळेल.

आनंद

गोव्याला जाताना तुमची कदाचित द्विधा मनस्थिती असेल, कंटाळलेले असाल मात्र गोव्याहून परत याला तेव्हा मन नक्कीच आनंदी असेल.

आणखीन बघा