Goa Tourism: गर्दीपासून दूर शांतता हवीय? दक्षिण गोव्यातील 'हा' बीच तुमच्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन

Manish Jadhav

माजोर्डा समुद्रकिनारा

गोव्यातील दक्षिण भागात असलेला माजोर्डा समुद्रकिनारा (Majorda Beach) हा पर्यटकांच्या पसंतीचा एक सुंदर आणि शांत किनारा आहे. 

Majorda Beach

पांढरी शुभ्र वाळू आणि स्वच्छता

माजोर्डा हा किनारा त्याच्या पांढऱ्या शुभ्र मऊ वाळूसाठी ओळखला जातो. उत्तर गोव्यातील किनाऱ्यांच्या तुलनेत हा किनारा अधिक स्वच्छ आणि कमी गर्दीचा आहे.

Majorda Beach | Dainik Gomantak

शांत आणि कौटुंबिक वातावरण

ज्या पर्यटकांना धावपळ आणि गोंगाटापासून दूर शांत वेळ घालवायचा आहे, त्यांच्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. कौटुंबिक सहलीसाठी हा किनारा अतिशय सुरक्षित आणि सुखद मानला जातो.

Majorda Beach | Dainik Gomantak

गोवन फूड आणि शॅक्स

किनाऱ्यावर अनेक 'बीच शॅक्स' (Beach Shacks) उपलब्ध आहेत, जिथे तुम्ही अस्सल गोवन सीफूड आणि पेयांचा आस्वाद घेऊ शकता.

Majorda Beach | Dainik Gomantak

वॉटर स्पोर्ट्सचा आनंद

जरी हा किनारा शांत असला, तरी येथे पॅरासेलिंग, जेट स्कीइंग, बनाना राईड आणि सर्फिंग यांसारख्या जलक्रीडांचा (Water Sports) आनंद पर्यटकांना घेता येतो.

Majorda Beach | Dainik Gomantak

नयनरम्य सुर्यास्त

माजोर्डा समुद्रकिनाऱ्यावरुन दिसणारा सुर्यास्त अतिशय मनमोहक असतो. संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर फिरताना सुर्यास्ताचा नजारा पाहणे हा पर्यटकांचा आवडता अनुभव असतो.

Majorda Beach | Dainik Gomantak

राहण्यासाठी उत्तम सोय

या किनाऱ्याच्या आजूबाजूला बजेट फ्रेंडली हॉटेल्ससारखे पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामुळे पर्यटकांना राहणे सोपे जाते.

Majorda Beach | Dainik Gomantak

बेस्ट ठिकाण

जर तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायचा असेल, तर दक्षिण गोव्यातील हा समुद्रकिनारा सर्वोत्तम पर्यात आहे.

Majorda Beach | Dainik Gomantak

Relationship Tips: पार्टनर काही न बोलताही बरंच काही सांगतो! 'या' 8 लक्षणांवरुन ओळखा नाराजी

आणखी बघा