Manish Jadhav
तुमचा जोडीदार मनातल्या मनात नाराज असेल, तर अनेकदा ते शब्दांतून व्यक्त होत नाही. त्यांच्या वागण्यातील काही छोटे बदल तुम्हाला बरंच काही सांगून जातात.
जर तुमचा जोडीदार अचानक कमी बोलू लागला असेल किंवा तुमच्या प्रश्नांना फक्त 'हो', 'नाही' किंवा 'ठीक आहे' अशी त्रोटक उत्तरे देत असेल, तर समजून जा की त्यांच्या मनात काहीतरी घोळत आहे.
नाराज असलेली व्यक्ती सहसा नजर चोरते. जर बोलताना तुमचा जोडीदार तुमच्याकडे बघण्याऐवजी फोनमध्ये किंवा दुसरीकडे बघत असेल, तर ती त्यांच्या नाराजीची स्पष्ट खूण असू शकते.
साध्या साध्या गोष्टींवरुनही जर जोडीदार चिडचिड करत असेल किंवा विनाकारण वाद घालत असेल, तर समजून घ्या की ही चिडचिड मूळ समस्येपेक्षा त्यांच्या मनातील दबा धरलेल्या नाराजीमुळे आहे.
तुम्ही एखाद्या आनंदाच्या गोष्टीबद्दल सांगत असाल आणि जोडीदाराकडून कोणताही उत्साह किंवा आनंद दिसत नसेल, तर याचा अर्थ त्यांचे लक्ष तुमच्या बोलण्यात नसून त्यांच्या नाराजीमध्ये आहे.
नाराज असल्यावर व्यक्ती शारीरिक जवळीक टाळते. चालताना लांब चालणे, बसताना अंतर राखणे किंवा स्पर्शापासून दूर राहणे या गोष्टींमधून जोडीदाराची नाराजी व्यक्त होते.
जेव्हा तुम्ही विचारता "काय झालंय?" आणि उत्तर "काही नाही" असं येतं, पण त्यांच्या चेहऱ्यावर ताण असतो, तेव्हा समजून जा की 'खूप काही' झालं आहे जे त्यांना सांगायचं नाहीये.
जर तुमचा जोडीदार त्यांच्या आवडीचे काम (उदा. गाणी ऐकणे, बाहेर जाणे) करणे बंद करुन एकांत शोधत असेल, तर हे त्यांच्या अस्वस्थ मनाचे लक्षण आहे.
तुमच्यासोबत असतानाही जर जोडीदार तासनतास फोनमध्ये व्यस्त राहत असेल, तर तो तुमच्यापासून आणि तुमच्याशी असलेल्या संवादापासून पळ काढण्याचा एक मार्ग असू शकतो.