Manish Jadhav
फेब्रुवारी महिना उद्या संपणार आहे. नवीन महिन्याच्या (1 मार्च) सुरुवातीपासून अनेक नियम बदलतात.
त्याचप्रमाणे, 1 मार्च 2025 पासून अनेक मोठे नियम बदलणार आहेत. ज्याचा परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो. चला तर मग कोणत्या नियमात बदल होणार आहेत जाणून घेऊया...
जर तुम्हीही अशा लोकांपैकी एक असाल जे त्यांचे कष्टाचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी फिक्स्ड डिपॉझिट (FD) मध्ये गुंतवणूक करतात, तर बदलणाऱ्या नियमांकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल.
मार्च 2025 पासून बँक एफडीच्या नियमांमध्ये काही मोठे बदल करण्यात आले आहेत. हे नवीन नियम केवळ तुमच्या रिटर्नवरच परिणाम करत नाहीत तर तुमच्या कर आणि पैसे काढण्याच्या पद्धतींवरही परिणाम करु शकतात. म्हणूनच, जर तुम्ही भविष्यात एफडी करण्याचा विचार करत असाल तर हे बदल समजून घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
मार्च 2025 पासून बँकांनी एफडीवरील व्याजदरात काही बदल केले आहेत. व्याजदर वाढू किंवा कमी होऊ शकतात. आता बँका त्यांच्या तरलता आणि आर्थिक गरजांनुसार व्याजदरांमध्ये लवचिकता ठेवू शकतात. लहान गुंतवणूकदारांवर, विशेषतः ज्यांनी 5 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी एफडी केली आहे, त्यांच्यावर नवीन दरांचा परिणाम होऊ शकतो.
तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमतींचा आढावा घेतात. अशा परिस्थितीत, 1 मार्च 2025 रोजी सकाळी तुम्हाला सिलिंडरच्या किमतीत बदल दिसू शकतो. सुधारित किंमती सकाळी सहा वाजता जाहीर केल्या जाऊ शकतात.
दर महिन्याच्या 1 तारखेला तेल कंपन्या विमान इंधन म्हणजेच एअर टर्बाइन फ्युएल (एटीएफ) आणि सीएनजी-पीएनजीच्या किमती देखील बदलतात.