Manish Jadhav
महिंद्राने पुन्हा एकदा कारप्रेमींना भुरळ पाडणारी शानदार कार लॉन्च केली. XUV 3XO ही कार डॉल्बी ॲटमॉस ऑडिओ सिस्टीमसह लॉन्च केली. ही सुविधा असलेली ही जगातील पहिलीच एसयूव्ही आहे, ज्याची किंमत 12 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.
या नवीन सिस्टीममध्ये सबवूफरसह 6-स्पीकर ऑडिओ सेटअप देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की, यामुळे प्रवासादरम्यान अत्यंत स्पष्ट आणि दमदार आवाज ऐकता येईल.
डॉल्बी ॲटमॉसची सुविधा REVX A, AX5L, AX7 आणि AX7L या नव्या व्हेरिएंट्समध्येही उपलब्ध असेल.
XUV 3XO हे महिंद्राचे डॉल्बी ॲटमॉसची सुविधा देणारे चौथे वाहन आहे. याआधी ही सुविधा BE 6, XEV 9e आणि थार ROXX या इलेक्ट्रिक आणि ऑफ-रोड एसयूव्हीमध्ये देण्यात आली होती.
महिंद्राच्या ऑटोमोटिव्ह विभागाचे अध्यक्ष आर वेलुसामी यांनी सांगितले की, ‘XUV 3XO सारख्या कमी किंमतीच्या एसयूवीमध्ये डॉल्बी ॲटमॉस सारखे प्रीमियम फीचर देऊन, आम्ही ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत.’
डॉल्बी ॲटमॉससह येणाऱ्या सर्व व्हेरिएंटची डिलिव्हरी सप्टेंबर 2025 च्या मध्यापासून सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहक लवकरच या नव्या फीचर्सचा अनुभव घेऊ शकतील.
नव्या व्हेरिएंट्सची किंमत 8.94 लाख (REVX A) पासून सुरु होते. तर XUV 3XO ची संपूर्ण रेंज 7.99 लाख ते 15.80 लाख (एक्स-शोरुम) या किमतीत उपलब्ध आहे.
ही एसयूव्ही तीन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे: 1 5 लीटर डिझेल (117 बीएचपी), 1.2 लीटर डायरेक्ट इंजेक्शन टर्बो पेट्रोल (131 बीएचपी) आणि 1.2 लीटर टर्बो पेट्रोल (111 बीएचपी). यात 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टरचे पर्यायही आहेत.