Manish Jadhav
Google ने न्यूयॉर्कमध्ये झालेल्या 'Made by Google 2025' कार्यक्रमात आपली नवीन Pixel 10 मालिका लॉन्च केली. या मालिकेत एकूण चार स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत. यामध्ये Pixel 10, Pixel 10 Pro, Pixel 10 Pro XL, आणि पहिला फोल्डेबल फोन Pixel 10 Pro Fold चा समावेश आहे.
या चारही स्मार्टफोनमध्ये Google च्या स्वतःच्या नेक्स्ट जनरेशन Tensor G5 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. यामुळे डिव्हाइसची कार्यक्षमता खूपच शक्तिशाली बनली आहे. Pixel 10 Pro Fold मध्ये तर Gemini Nano ऑन-डिव्हाइस AI देखील देण्यात आले आहे.
Pixel 10 मालिकेतील सर्व फोन Android 16 वर आधारित आहेत. Google ने या सर्व डिव्हाइससाठी तब्बल 7 वर्षांपर्यंत OS अपडेट्स आणि सुरक्षा पॅच देण्याचे आश्वासन दिले आहे, जो एक मोठा Plus Point आहे.
Pixel 10 Pro आणि Pro XL मध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 48 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड आणि 5x ऑप्टिकल झूमसह 48 मेगापिक्सलचा टेलीफोटो लेन्स देण्यात आला आहे. तर, Pixel 10 मध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आहे.
या स्मार्टफोनमध्ये हाय रिफ्रेश रेट आणि 3,000 निट्सपर्यंतची ब्राइटनेस असलेले OLED डिस्प्ले आहेत. Pixel 10 Pro मध्ये 1Hz ते 120Hz पर्यंतचा डायनॅमिक रिफ्रेश रेट मिळतो. सर्व फोन IP68 रेटिंगसह येतात आणि त्यांवर Corning Gorilla Glass Victus 2 चे प्रोटेक्शन आहे.
Pixel 10 Pro XL मध्ये 5,2000mAh ची सर्वात मोठी बॅटरी आहे, जी 45W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Pixel 10 मध्ये 4,970mAh बॅटरी आणि 30W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.
Pixel 10 Pro Fold हा Google चा भारतातील दुसरा आणि या सिरीजमधील पहिला फोल्डेबल फोन आहे. यात 6.4 इंचचा कव्हर डिस्प्ले आणि 8 इंचचा मोठा फोल्डेबल डिस्प्ले मिळतो, जो मल्टीटास्किंगसाठी उत्तम आहे.
Google Pixel 10 सिरीजची किंमत भारतात 79,999 पासून सुरु होते. Pixel 10 Pro ची किंमत 99,999 पासून तर Pixel 10 Pro XL ची किंमत 1,19,999 पासून सुरु आहे. सर्वात महागडा Pixel 10 Pro Fold 1,72,999 मध्ये उपलब्ध असेल.