Manish Jadhav
गेल्या वर्षी (2024) महिंद्राने SUV XUV 3XO मार्केटमध्ये लाँच केली होती. ती तिच्या सेगमेंटमधील सर्वोत्तम कॉम्पॅक्ट एसयूव्ही असल्याचे सिद्ध झाली.
यातच आता, ग्राहकांच्या मागणीचा विचार करुन कंपनी XUV 3XO चे इलेक्ट्रिक मॉडेल लाँच करणार आहे. अलीकडेच ही कार चाचणी दरम्यान दिसली होती.
सूत्रानुसार, यावर्षी मार्चमध्ये महिंद्रा मार्केटमध्ये मोठा धूमधडाका करु शकते. असे मानले जाते की, ही कंपनीची सर्वात स्वस्त ईव्ही असू शकते. सध्या महिंद्राकडून या कारबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.
माहितीनुसार, नवीन इलेक्ट्रिक XUV 3XO मध्ये 34.5 kWh बॅटरी पॅक मिळू शकतो. फूल चार्ज केल्यावर ही एसयूव्ही 400 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. त्यात डीसी फास्ट चार्जिंगची सुविधा देखील उपलब्ध असेल. XUV 3XO EV च्या लीक झालेल्या स्पाय शॉट्समध्ये या कारची डिझाइन स्पष्टपणे दिसून येते.
डिझाइनच्या बाबतीत फारसे बदल होणार नाहीत. यात रुफ रेल, ORVM आणि शार्क फिन अँटेना आणि 360-डिग्री कॅमेरे, 10.25-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, 6 एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि EPB सारखी फिचर्स असू शकतात.
भारतात या नवीन इलेक्ट्रिक एसयूव्हीची किंमत 11.99 लाख रुपयांपासून सुरु होऊ शकते. महिंद्राची ही कार टाटा नेक्सॉन ईव्हीला टक्कर देऊ शकते.