Manish Jadhav
भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट खूप लोकप्रिय आहे, जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होतो तेव्हा दोन्ही देशांचे क्रिकेट चाहते खूप उत्साहित असतात.
आता दोन्ही संघ फेब्रुवारी महिन्यात 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आमनेसामने येण्यास सज्ज आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यातील शानदार सामना 23 फेब्रुवारी रोजी दुबई येथे होणार आहे.
आज (13 जानेवारी) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होण्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड कसा आहे ते जाणून घेऊया.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण 5 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी पाकिस्तानने तीन तर भारताने दोन सामने जिंकले आहेत.
2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील पराभवाने भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता. पाकिस्तानने हा सामना 180 धावांनी जिंकला होता. या सामन्यातच फखर झमानने 114 धावांची तूफानी खेळी खेळली होती.
सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2002 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा संयुक्त विजेता बनला होता. भारत आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम सामना पावसामुळे होऊ शकला नाही, ज्यामध्ये दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित करण्यात आले होते.
यानंतर, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 चे विजेतेपद जिंकले होते. भारताने आतापर्यंत दोनदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली असून पाकिस्तानने एकदा जिंकली आहे.