Manish Jadhav
देशातील आघाडीची SUV उत्पादक कंपनी Mahindra ने अलीकडेच Mahindra XEV 9e आणि BE 6 चे टॉप मॉडेल लॉन्च केले.
Mahindra XEV 9e ची एक्स-शोरुम किंमत 21.90-30.50 लाख रुपये आहे तर BE 6 ची एक्स-शोरुम किंमत 18.90-26.90 लाख रुपये एवढी आहे.
महिंद्राची भारतात स्थिती अतिशय मजबूत असून आता कंपनीची नजर जागतिक बाजारपेठेवर आहे.
महिंद्राने इलेक्ट्रिक कार आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आणल्यास एलन मस्कच्या टेस्ला आणि चीनच्या बीवायडी सारख्या ईव्ही कंपन्यांसमोर आव्हान वाढेल.
महिंद्राने ईव्हीसाठी 16,000 कोटी रुपये खर्च करण्याची योजनाही आखली आहे. महिंद्रा टप्प्याटप्प्याने विविध देशांमध्ये आपली उपस्थिती वाढवेल.
कंपनीचे लक्ष्य पिकअप ट्रक आणि इलेक्ट्रिक कारच्या नवीन श्रेणीच्या निर्मितीवर आहे. अशा प्रकारे टेस्ला आणि बीवायडी सारख्या जागतिक स्तरावरील ईव्ही कंपन्यांना स्पर्धेला सामोरे जावे लागेल.
पहिल्या टप्प्यात, महिंद्रा गेल्या तीन ते चार वर्षात लॉन्च केलेल्या कार त्या आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये लॉन्च करेल जिथे त्यांचे अस्तित्व आहे.