Sameer Amunekar
थेट व्यायाम सुरू केल्याने स्नायूंवर ताण येतो आणि दुखापतीची शक्यता वाढते.
आपल्या क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम केल्याने सांधे व हाडांना त्रास होऊ शकतो.
व्यायामाच्या आधी व नंतर पुरेसं पाणी न घेतल्याने शरीरात डिहायड्रेशन होतं.
योग्य तंत्र न वापरल्याने स्नायू दुखतात किंवा व्यायामाचा परिणाम दिसत नाही.
अधूनमधून व्यायाम केल्याने फायदा कमी होतो; नियमितपणा आवश्यक आहे.
व्यायामानंतर शरीराला विश्रांती व झोप न दिल्यास पुनर्बांधणी होत नाही.
हाडं, सांधे किंवा हृदयाशी संबंधित त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं टाळणं धोकादायक ठरू शकतं.