Sameer Panditrao
वागातोर येथील वझरान या समुद्रकिनारी स्थानिक लोकांबरोबरच देशी तसेच विदेशी पर्यटक एकत्रित येत महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करतात.
सांगे येथे महाशिवरात्रीनिमित्त नेत्रावळी येथील प्रसिद्ध अशा बुडबुड तळीवर भाविकांनी स्नान करून देवांना महाभिषेक केला.
माडेल-थिवी येथे महाशिवरात्रीनिमित्त स्वहस्ते अभिषेक करण्यासाठी पहाटे ४ वाजल्यापासून भाविकांनी माडेल-थिवी येथील श्री महागणपती भवानी शंकर मंदिरात उपस्थिती लावली होती.
महाशिवरात्रीनिमित्त गौतमेश्वर मंदिरात गौतमेश्वरावर भाविकांकडून अभिषेक करण्यात आला.
झाडानी गावात महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. हे झाडानी गाव आजही शेकडो वर्षांची महती सांगत आहे.
हरवळे येथील श्री रुद्रेश्वराचे दर्शन घेताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सुलक्षणा सावंत व इतर.
कुर्टी महादेव मंदिरात श्रींचे दर्शन घेताना वीजमंत्री सुदिन ढवळीकर. सोबत इतर जिल्हा पंचायत सदस्य प्रिया च्यारी.