Sameer Amunekar
गोवा सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध असला तरी, येथे अनेक प्राचीन आणि ऐतिहासिक महादेव मंदिरे देखील आहेत.
मंडलेश्वर मंदिर गोवा राज्यातील दक्षिण गोव्यातील शिरोडा गावात स्थित एक प्राचीन शिव मंदिर आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे विशेष धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.
हे मंदिर श्री मंगेश (शंकराचे एक रूप) यांना समर्पित आहे. गोव्यातील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. हे हिंदू वास्तुकलेचं एक उत्तम उदाहरण आहे.
तांबडी सुर्ला हे गोव्यातील सर्वात प्राचीन शिवमंदिर मानलं जातं. 12व्या शतकात कदंब राजवटीच्या काळात हे मंदिर बांधलं गेलं. हे मंदिर पूर्णपणे काळ्या दगडांना बांधलं असून, ते दाट जंगलाने वेढलेले आहे.
हे मंदिर पुरातन असून, स्थानिक लोकांसाठी श्रद्धास्थान आहे. येथे महाशिवरात्रीला मोठा उत्सव साजरा केला जातो. मंदिरात नागेश शिवलिंगासह शिव-पार्वती आणि गणेशाच्या मूर्ती आहेत.
श्री सप्तकोटेश्वर मंदिर हे गोव्याच्या महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक असून, चोल राजवटीच्या काळात बांधले गेले होते. शिवाजी महाराजांनी या मंदिराची पुनर्बांधणी केल्याची माहिती आहे.