Summer Tourism: उन्हाळ्यात फॅमिलीसोबत फिरायला जायचंय? गोव्यातील 'ही' थंड हवेची ठिकाणं अजिबात मिस करू नका

Sameer Amunekar

तांबडी सुर्ला महादेव मंदिर

तांबडी सुर्ला महादेव मंदिर 12व्या शतकातील प्राचीन कदंबकालीन मंदिर आहे. हे मंदिर घनदाट जंगलात वसलेलं आहे. येथे निसर्गरम्य सौंदर्य आणि थंड वातावरण आहे. ट्रेकिंग प्रेमींसाठी उत्तम ठिकाण.

Goa Summer Destination | Dainik Gomantak

नेत्रावळी वन्यजीव अभयारण्य

येथे ताज्या पाण्याचा निसर्गनिर्मित तलाव, जिथे मासेज फिश थेरपीचा अनुभव घेता येतो. शांत व हिरव्यागार जंगलाने वेढलेले हे अभयारण्य आहे.

Goa Summer Destination | Dainik Gomantak

महालसा (म्हाळसा) मंदिर

ऐतिहासिक आणि शांत ठिकाण, उन्हाळ्यात येथील वातावरण प्रसन्न असते.मंदिर परिसरात स्वच्छ व सुंदर बाग पाहायला मिळते.

Goa Summer Destination | Dainik Gomantak

मोले नॅशनल पार्क

निसर्गप्रेमी आणि वन्यजीव प्रेमींसाठी हे उत्तम ठिकाण आहे. पक्षी निरीक्षण, हत्ती सफारी आणि निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी असतं.

Goa Summer Destination | Dainik Gomantak

साळावली धरण

गोव्यातील कमी प्रसिद्ध पण नयनरम्य ठिकाण, जिथे उन्हाळ्यातही गारवा असतो. पिकनिकसाठी हे उत्तम ठिकाण आहे.

Goa Summer Destination | Dainik Gomantak

पाळोळे बीच

शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य किनारे, उन्हाळ्यात समुद्रकिनारी आराम करण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. बोट राईड आणि डॉल्फिन सफारीसाठी हे बीच प्रसिद्ध आहे.

Goa Summer Destination | Dainik Gomantak
Goa Beach | Dainik Gomantak
समुद्रकिनारी जाताना 'या' गोष्टी सोबत ठेवा