Sameer Amunekar
दिवसभर पुरेसे पाणी प्या. पाण्यामुळे ओठांचा कोरडेपणा कमी होतो आणि नैसर्गिक गुलाबीपणा येतो.
नैसर्गिक घटकांचा लिप बाम वापरा. दिवसा आणि रात्री झोपण्यापूर्वी लावा. हिवाळ्यात विशेषतः ओठ मोडण्यापासून वाचवते.
1 चमचा साखर + 1 चमचा मध मिक्स करा. हलक्या हाताने ओठांवर 2–3 मिनिटे मसाज करा. आठवड्यातून 2–3 वेळा स्क्रब केल्यास ओठ मऊ आणि गुलाबी होतात.
रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर नारळाचे किंवा बदामाचे तेल लावा. हे ओठांची नमी टिकवते आणि फाटलेले ओठ बरी होतात.
घरच्या घरी दही किंवा गुलाबजल + मधाचा लिप मास्क तयार करा. 10–15 मिनिटे लावा आणि नंतर हलक्या हाताने स्वच्छ करा.
उन्हात बाहेर जाताना लिप बामसह SPF असलेले सनस्क्रीन लावा. सूर्याच्या किरणांमुळे ओठ काळे पडू नयेत.
स्मोकिंग, चहा-कॉफी अधिक प्रमाणात घेतल्यास ओठावर डाग येऊ शकतात. 3 दिवसांत परिणाम हवे असल्यास हे टाळणे खूप महत्वाचे आहे.