Sameer Amunekar
त्वचेला नैसर्गिक चमक देण्यासाठी हायड्रेशन महत्त्वाचं आहे. दिवसाला किमान 8 ग्लास पाणी प्या.
झोपेअभावी त्वचा थकलेली आणि निस्तेज दिसते. रोज 7-8 तासांची झोप घ्या.
हातांवरील जंतू त्वचेवर येतात आणि पिंपल्स होऊ शकतात. चेहऱ्यावर हात कमी लावा.
सूर्यकिरणांमुळे त्वचा काळवंडते आणि कोरडी पडते. घराबाहेर पडण्यापूर्वी नेहमी सनस्क्रीन लावा.
महागडे प्रॉडक्ट्स नेहमी उपयोगी ठरत नाहीत. नैसर्गिक घटक असलेले हलके प्रॉडक्ट्स वापरा.
फळे, भाज्या, नट्स आणि पाण्याने भरपूर पदार्थ खा. आतून पोषण मिळालं तर त्वचा आपोआप उजळते.
रात्री मेकअप ठेवून झोपल्यास पोर्स बंद होतात. झोपण्यापूर्वी फेस क्लीन्सरने चेहरा नीट धुवा.